मंत्री मंडळ विस्तारात घराणेशाहीचा विस्तार

    दिनांक : 30-Dec-2019
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारचा अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळात तरूण आमदारांना स्थान देण्यात आलं आहे. यासोबतच मंत्रिमंडळातील सहा आमदार हे राजकीय कुटुंबातील वारस आहेत. यामध्ये एका अपक्ष आमदाराचाही समावेश असून युवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. आदित्य ठाकरे प्रथमच आमदार म्हणून निवडून आले असताना त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

j_1  H x W: 0 x 
 
 
आदित्य ठाकरेंप्रमाणेच अमित देशमुख यांनीही ही ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेसमधील दुसरं नाव म्हणजे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यानीही राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादीतील माजी आमदार आणि खासदार प्रसाद तनपुरे यांचे पुत्र प्राजक्त तनपुरे यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे.
या नावां व्यतिरिक्त अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शंकरराव हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत.