मंत्रिमंडळ विस्तारासाठी महाविकास आघाडीचा ताळमेळ बसेना

    दिनांक : 03-Dec-2019
मुंबई : मोठ्या नाट्यमय घडामोडी नंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजित झाल्य्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्री मंडळाची घोषणा करतील असे वाटत होते. परंतु अजूनही महाविकास आघडी मध्ये मंत्रिपद वाटपावरून ताळमेळ बसत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मंत्री मंडळाचा विस्तार तातडीने होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
 

k_1  H x W: 0 x 
 
मंत्री मंडळातील खातेवाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत गेले आहेत. दरम्यान, काही खात्यांवरून अजूनही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेय या तिन्ही पक्षात मतभेद असल्याची बाब पुढे येत आहे. त्यामुळे खातेवाटप होण्यास उशीर लागत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सरकारने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. परंतु मंत्री मांडला अभावी कामे कशी सुरु होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये ताळमेळ बसत नसल्यामुळे महाराष्ट्रातील खातेवाटप आजही होऊ शकले नाही. त्यामुळे कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याची उत्सुकता सर्वाना लागून आहे. खाते वाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत आहेत. आज संध्याकाळी काँग्रेस नेते मुंबईत परत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्र विकासआघाडीतील तिन्ही पक्षांची बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रात्री खातेवाटप होण्याची शक्यता आहे.