काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न

    दिनांक : 03-Dec-2019
जळगाव: शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजेश जाधव उपस्थित राहिले होते. तसेच विवेकानंद प्रतिष्ठानचे सह कोशाध्यक्ष पुनम मानूधने, प्रशासकीय अधिकारी दिनेश ठाकरे, क्रीडा प्रमुख सूर्यकांत पाटील, एन सी सी चे हवालदार हेमा राम तसेच मुख्याध्यापक अमित सिंग भाटिया आणि प्राथमिक विभागाचे प्रमुख डॉ. विनोद पाटील व समन्वयिका स्वाती अहिरराव उपस्थित होत्या.

ज_1  H x W: 0 x
 
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन करण्यात आली व नंतर गीत सादर करण्यात आले. इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना परेड करून मानवंदना दिली. इयत्ता पाचवी चा विद्यार्थी अर्णव लढे व सर्व विद्यार्थ्याने सामूहिक शपथ घेतली. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पोम पोम घेऊन कवायत सादर केली. तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी एरोबिक्स सादर केले. नंतर रोहिणी पवार या विद्यार्थिनीने एरियल सिल्क वरील योगासने प्रदर्शित केली. राष्ट्रीय खेळाडू निनाद, इशांत, निखिलेश, समृद्धी यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून विविध खेळांच्या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ प्रमिला भादूपोता यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्रमुखांचे तसेच क्रीडा विभागाचे मार्गदर्शन लाभले, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.