आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी- अभाविपची मागणी

    दिनांक : 03-Dec-2019
नंदुरबार: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेतर्फे हैद्राबाद स्थित पशुवैद्यक डॉक्टर प्रियंका रेड्डी हिच्यावर बुधवारी सायबराबाद येथे झालेल्या अमानुष बलात्कार व हत्येविरोधात शहरात संवेदना कँडेल मार्च (मूक मोर्चा) काढण्यात आला. या संवेदना रॅली मध्ये शहरातील नागरिक व परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
 
ह_1  H x W: 0 x
 
 
अभाविप नंदुरबार जिल्हा संयोजक निलेश हिरे यांनी ह्या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला व ह्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी व दोषींना लवकरच फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. महिलांच्या रक्षणासाठी कठोर कायदे हवेत व त्याची योग्य तीअंमलबजावणी व्हायला हवी. भारताच्या मातृशक्तीने स्वतःला दुर्बल समजू नये तर त्यांनी आपली शक्ती ओळखण्याची गरज आहेअसेही त्यांनी सांगितले. विद्यार्थी परिषदतर्फे महिला स्वसंरक्षणासाठी जुडो कराटे चे प्रशिक्षण देण्यात येते. या संदर्भातील पूर्ण भारतात मिशन साहसी हा उपक्रम राबविण्यात येतो, या बद्दल माहिती दिली.
 
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या ऍड.उमा चौधरी यांनी महिलांनी सशक्त व्हावे तसेच न्यायालयीन प्रक्रिया व महिलांच्या न्यायहक्कांविषयी माहिती देत घटनेचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी अभाविप शहर अध्यक्ष प्रा. प्रकाश गवळे, शहरआंदोलन प्रमुख हार्दिक वाघेला, सोमेश जोशी, ललित देसले, काशिनाथ पिसाळ, किशोर कोळेकर, प्रा.हिम्मतराव चव्हाण, प्रा.गौरीशंकर धुमाळ व शहरातील अन्य नागरिक उपस्थित होते.