वयोवृद्धांसाठी मोदी सरकारची श्रम-योगी-मान-धन योजना सुरु

    दिनांक : 03-Dec-2019
मुंबई: आयुष्याच्या उतार वयात आल्यानंतर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अनेक योजना व उपक्रम सरकारतर्फे आणले गेले आहेत. मोदी सरकारचेही या दृष्टीने वयो वृद्धांच्या हितासाठी महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. जेव्हा शरीराचे काम करणे थांबते अश्या वयातही सर्वांच्या सामाजिक गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी सरकारने नवीन योजना सुरु केली आहे. श्रम रोजगार मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी यासंदर्भात माहिती दिली.

म_1  H x W: 0 x
 
वयोवृद्धांना मासिक पेन्शनच्या रुपाने आर्थिक सुरक्षा मिळावी या उद्देशाने श्रम आणि रोजगार मंत्रालयाने प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन योजना सुरू केली आहे. वयाच्या साठाव्या वर्षी मासिक किमान 3,000 रुपयांची पेन्शन या योजनेअंतर्गत मिळते. असंघटीत क्षेत्रातल्या 18 ते 40 वयोगटातल्या 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक उत्पन्न असणारे आणि इपीएफओ/ईएसआयसी/एनपीएसचे सदस्य नसलेले कामगार या योजनेत सहभागी होऊ शकतात. 50 टक्के मासिक योगदान लाभार्थीने भरायचे असून उर्वरित 50 टक्के योगदान केंद्र सरकार भरणार आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.