असे अन्न. पाणी देशासाठी आवश्यक तसाच नागरिकत्व कायदाही गरजेचा - संभाजी भिडे

    दिनांक : 21-Dec-2019
कोल्हापूर: येथे पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडे यांनी नागरिकत्व कायद्यावरून कॉंग्रेसवर टीका केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. नागरिकत्व कायद्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या कोट्यवधी भारतीयांना आनंद व्हायला हवा. दुर्दैवाने आपला देश हा माणसांना आहे, पण देशभक्तांचा नाही. त्यामुळे त्यांना या कायद्याचा अर्थ कळत नाही. स्वार्थ हाच ज्यांचा धर्म आहे, त्यांनी कायद्याला विरोध करीत गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. हा देशद्रोह आहे, अशी टीका भिडे यांनी केली.
 

अ_1  H x W: 0 x 
 
देशभक्त असलेल्या कोणत्याही नागरिकाला या कायद्याचे कौतुक वाटेल, हा कायदा फार आधीच व्हायला हवा होता. यापूर्वी हा कायदा लोकसभेत सादर केला गेला होता. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी सुद्धा नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करा, अशी मागणी केली होती. त्याचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. आज त्याच ममता या कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत, असे भिडेंनी सांगितले.
 
हा कायदा कोणत्याही स्थितीत लागू झाला पाहिजे. जसे माणसाला अन्न, पाणी आणि निवारा लागतो, तसाच हा कायदा देशासाठी आवश्य आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जे काम करतात, त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे आवाहनही भिडेंनी केले.