पिंपळकोठा गोळीबार प्रकरणातील एक आरोपी ताब्यात

    दिनांक : 02-Dec-2019
पारोळा: तालुक्यातील पिंपळकोठा येथे पिल्लुक देवीच्या यात्रोत्सवादरम्यान दोन गटात वाद निर्माण होऊन थेट गोळीबार होण्याची घटना घडली होती. त्या गुन्ह्यातील एक फरार आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित आरोपी शोधण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

l_1  H x W: 0 x 
 
या घटने संदर्भात बाळा उर्फ तुषार प्रदिप कदम वय १९ रा. नवलनगर याच्याविरुद्ध भा.द.वि.३०७ आर्म अँक्ट, ३/२५ प्रमाणे पिपळकोठे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावातील गोळीबार प्रकरणी गोळी झाडल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासुन आरोपी बाळा उर्फ तुषार कदम हा फरार होता. गुप्त माहितीनुसार तो धुळे शहरात फिरत असल्याच्या माहितीवरून पोलिसअधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी ससाणे अमळनेर, पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. रविंद्र रावते, पो.काँ सुनिल साळुखे, किशोर भोई, दिपक अहीरे तातडीने जावुन त्यास ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी सदर आरोपीस पारोळा पोलीस ठाण्यात आणले आहे. गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षीक लिलाधर कानडे करीत आहे.