कॉंग्रेस नेत्याची निर्मला सीतारामन यांच्यावर विवादित टिप्पणी

    दिनांक : 02-Dec-2019
नवी दिल्ली : कॉर्पोरेट करातील कपातीच्या मुद्द्यावर चर्चा करत असताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका करत त्यांना 'निर्बला' सीतारामन असे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद होण्याची शक्यता आहे.
 
cm_1  H x W: 0
 
 
संसदेत सोमवारी कॉर्पोरेट करातील कपातीच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना अर्थमंत्री सीतारामन यांनी या मुद्द्यावर सरकारची बाजू मांडली. यानंतर या मुद्द्यावर बोलताना चौधरी म्हणाले की, 'आम्ही तुमचा खूप आदर करतो. मात्र कधी-कधी तुम्हाला निर्मला सीतारामन म्हणण्या ऐवजी 'निर्बला' सीतारामन म्हणण्याचं मन होतं. तुम्ही मंत्रिपदावर तर आहात, मात्र तुमच्या मनात जे आहे, ते तुम्हाला बोलता येत नाही.' असे ते म्हणाले आहेत.
 
डॉक्टर प्रियांका रेड्डी प्रकरणावर देशभरात संताप व्यक्त होत असताना कॉंग्रेस खासदार रंजन चौधरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या नजरेतील स्त्री संमानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आशयाच्या प्रतिक्रिया समाज माध्यमात उमटू लागल्या आहेत.