अखेर 'नटसम्राट' कायमचा हरवला...

    दिनांक : 18-Dec-2019
पुणे: ज्येष्ठ अभिनेते ड़ॉ. श्रीराम लागू याचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात लागू यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लागू यांच्या जाण्याने कलाविश्वातील एक कसलेला अभिनेता, प्रेक्षकांचा हक्काचा 'नटसम्राट' हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

k_1  H x W: 0 x
 
 
१६ नोव्हेंबर १९२७ला त्यांचा जन्म झाला होता. 'सिंहासन', 'पिंजरा', 'मुक्ता' या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. तसेच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. डॉ. लागू यांनी सुमारे १२५हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीसोबतच बॉलिवूडमध्ये ही एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आयुष्यात अनेक चढ-उतार आल्यानंतरही त्यांनी खचून न जाता प्रत्येक प्रसंगाला तोंड दिले. अभिनेत्री दीपा लागू या त्यांच्या पत्नी आहेत.