नागपूर सुरत महामार्ग चे कामाला लवकर शुभारंभ होणार

    दिनांक : 17-Dec-2019
नवापूर- तालुक्यातील बेडकीपाडा ते धुळे जिल्ह्यातील फागणे येथील चौपदरीकरणाचे काम निधी अभावी दीड वर्षापासून रखडलेले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने कामाचे उर्वरीत कामाचे 13 डिसेंबर 2019 रोजी नोटीस वेब साईडवर अपलोड केली आहे. 29 डिसेंबर रोजी टेंडर नोटीस ओपन होईल. इच्छुक नामांकित कंपनी अनुभव, साधनसामग्री व टेंडर रक्कम भरवून टेंडर भरतील. त्यानंतर चौपदरीकरणाचे काम सुरू होईल.
 

m_1  H x W: 0 x 
 
यासंदर्भात नवी दिल्ली येथे नवापूर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार शिरिषकुमार नाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे कार्यालयाला भेट देऊन नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा ते फागणे चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच वाहन चालकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. इंधनाचे नुकसान होत आहे.
 
अनेक समस्या निर्माण झाल्याने नागपूर-सुरत क्रमांक सहा महामार्गाचे रखडलेले काम लवकर सुरू करण्याबाबत अधिकारी यांचाशी चर्चा केली होती. त्यानंतर आठवडाभरात टेंडर नोटिस वेब साईट प्रकाशित झाल्याने चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार शिरिषकुमार नाईक यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला दिलेली भेट सार्थक झाली असल्याचे बोलले जात आहे.