देशात पुन्हा जालियनवाला घडविण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    दिनांक : 17-Dec-2019
नागपूर: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठासह अन्य विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. ते अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडून टाकले जात आहे. देशात पुन्हा एकदा 'जालियनवाला बाग' घडवण्याचा प्रयत्न केला जातोय का अशी शंका येते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

l_1  H x W: 0 x 
 
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी याविरोधात देशात मोठे आंदोलन उभे राहिले आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
 
राज्यात सत्तांतर करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याची टीका सर्व स्तरातून होत होती. कालच उद्धव ठाकरे यांनी युती तोडली म्हणजे धर्मांतरण केल नाही असे वक्तव्य दिले होते. परंतु २४ तास होण्याच्या आत त्यांच्या या विधानाने खळबळ उडवून दिली आहे.