विधान परिषदेत 'या' नेत्याची विरोधी पक्षनेता म्हणून लागली वर्णी

    दिनांक : 16-Dec-2019
मुंबई: राज्यातील सत्तापरिवर्तन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर, भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. सर्वात आधी या शर्यतीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस, सूरजीतसिंह ठाकूर यांची नावंही चर्चेत होती. मात्र प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे.
 

दरेकर _1  H x W 
प्रवीण दरेकर विधान परिषदेत भाजपचे प्रतिनिधित्व करतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेकडून उमेदवारी मिळवली होती. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. त्या अगोदर दरेकर हे शिवसेनेत होते. दरेकर सध्या माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. विधानपरिषदेत भाजपचे संख्याबळ २२, शिवसेना १२, राष्ट्रवादी कॉंग्रेस १३ आणि कॉंग्रेसचे १४ सदस्य आहेत.