नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास आता मुंबईतही विरोध

    दिनांक : 16-Dec-2019
मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारतात सुरु झालेल्या या विधेयकाच्या विरोधाचे हळूहळू देशभरात लोन पसरत असल्याचे दिसून येत आहे. आसाम मध्ये सुरु झालेले आंदोलन बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश नंतर आता महाराष्ट्रात मुंबई येथे येऊन पोहचले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले असून या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

a_1  H x W: 0 x 
 
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (Citizenship Amendment Act)पूर्वोत्तर राज्य, पश्चिम बंगाल आणि राजधानी दिल्लीनंतर आता मुंबईत आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. टीसच्या विद्यार्थ्यांनी रविवारी सायंकाळी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध म्हणून आंदोलन केले आहे. या आंदोलनात त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे.
दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह १०० हून अधिक जण जखमी झाले. अग्निशमन दलातील जवानांवर हल्ला करण्यात आल्यानंतर पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवारात अश्रूधुराच्या निळकांड्या फोडल्या. त्यानंतर विद्यापीठात घुसलेल्या आंदोलकांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांविरोधात झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.