राम मंदिर निकाला विरोधातील सर्व याचिका नायायालयाने फेटाळल्या

    दिनांक : 12-Dec-2019
नवी दिल्ली: अयोध्या  वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निकाल देत ती जागा प्रभू श्री रामाची असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या होत्या. त्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज १२ डिसेंबर रोजी फेटाळून लावल्या आहेत.

s_1  H x W: 0 x 
 
अयोध्येतील 'ती' जागा हिंदूंची असून रामजन्मभूमीच्या जागेवरच मंदिर उभारावे. त्यासाठी ट्रस्ट स्थापन करावे असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला होता. राममंदिर उभारणीसाठी ट्रस्टची तीन महिन्यांत स्थापना करण्यात यावी. या ट्रस्टद्वारे मंदिर निर्माणासंदर्भात नियम तयार करावेत, असे आदेशही सरन्यायाधीश गोगोई यांनी केंद्र सरकारला दिले होते. बाबरी मशिदीखाली मंदिर होते हे न्यायालयाने मान्य केले होते. त्यामुळे मशीद उभारण्यासाठी अयोध्येत दुसरीकडे 5 एकर जागा द्यावी. उत्तर प्रदेश सरकार किंवा केंद्राकडून ही जागा देण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले होते. पुरातत्व खात्याने दिलेल्या अनेक पुराव्यांचाही संदर्भ न्यायालयाने यावेळी दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात निर्मोही आखाडा, हिंदू महासभा, मुस्लीम लॉ बोर्ड यांच्यासह तब्बल 18 पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. तथापी त्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.