टी-ट्वेंटी रँकिंगमध्ये भारतीय संघाच्या तीन फलंदाजांचा समावेश

    दिनांक : 12-Dec-2019

मुंबई: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी लढतीच्या मालिकेतील तुफानी फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 5 स्थानांची झेप घेत आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये 10 स्थानावर मजल मारली आहे. तसेच आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टी-20 गुणांकनात तीन भारतीय फलंदाजांनी टॉप 10 फलंदाजांत स्थान मिळवले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजची धुलाई भारतीय संघाच्या चांगलीच पथ्थ्यावर पडलेली दिसत आहे.

 

k_1  H x W: 0 x 
 

भारताचा सलामीवीर के. एल. राहुल या यादीत 794 अंकांसह सहाव्या स्थानी असून हिटमॅन रोहित शर्मा 686 गुणांसह नवव्या आणि कर्णधार विराट कोहली 685 गुण मिळवत दहाव्या स्थानी आहे.पाकिस्तानचा बाबर आझम याने 879 गुणांसह टॉपचे स्थान स्वतःकडे राखले आहे. ऑस्ट्रेलियाचा ऍरॉन फिंच 810 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.विशेष म्हणजे टी-20तील टॉप टेन फ़लंदाजांत ऑस्ट्रेलियाच्या दोन तर हिंदुस्थानच्या तीन फलंदाजांनी स्थान मिळवले आहे. अफगाणिस्तानच्या हजरतउल्लाह याने आठवे स्थान गाठले आहे हे विशेष.