नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात ईशान्य भारतात निदर्शने

    दिनांक : 12-Dec-2019
गुवाहाटी : संरक्षण दलांनी पुकारलेली संचारबंदी अक्षरश: धुडकावून लावत हजारो नागरिक येथे रस्त्यावर उतरले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. मात्र तरीही निर्भयीपणाने नागरिकांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला आपला विरोध दर्शवला.

l_1  H x W: 0 x 
 
 
जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी गुवाहाटीच्या लालुंग भागात पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. याशिवाय पोलिसांनी शहराच्या अनेक भागात गोळीबार केला. गुवाहाटी शिलॉंग महामार्गाला तर युध्दभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नागरिकांनी दुकाने आणि इमारतींची नासधुस सुरू केली. जागोजागी टायर्स पेटवले. सुरक्षा दलांशी अनेक ठिकाणी चकमक उडाल्याचरे चित्र होते.
लाटाशील क्रीडांगणावर आसू आणि केएमएसएसने मेळावा निमंत्रीत केला होता. त्याला शेकडोंच्या संख्यने विद्यार्थी आणि तरूण उपस्थित होते. त्यात जूईन गर्ग यांसह अनेक नामवंत सहभागी झाले होते. हे विधेयक मंजूर करून आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या जनतेवर सुड उगवत आहेत, अशी टीका आसूचे सल्लागार समुज्जल भट्टाचार्य यांनी यावेळी केली. या मेळाव्यात या कायद्याच्या निषेधार्थ दरवर्षी 12 दिसेंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्धार व्यक्त करण्यता आला.
CAB