मुंबई पालिकेत भाजपचा महापौर होणार - राम कदम

    दिनांक : 11-Dec-2019
मुंबई: मुंबईचा पुढचा महापौर भाजपाचा असणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. गेल्या वेळेला आम्ही एक ते दोन जागावर कमी पडलो होतो मात्र आता मुंबईचा महापौर भाजपाचाच असेल असा विश्वास भाजपा आमदार आणि राम कदम यांनी व्यक्त केला आहे. हे सरकार स्थापन होऊन 11 दिवस झाले. यांना खातेवाटप करता आले नाही. मंत्रिपद कुणाला द्यायचे याचा विचार हे सरकार करत आहे. त्याचे कारण म्हणजे फार मोठा गट फुटेल ही भीती या सरकारला आहे.

l_1  H x W: 0 x 
 
आता सरकार स्थापन झाले तरी यांच्यामध्ये भीती आहे. हे विकास विरोधी सरकार आहे. कंत्राटदारानी यांना भेटावे असे यांना वाटत आहे का? तसेच कंत्राटदारांनी यांना का भेटावे? विकासाची कामे यांना थांबवता येणार नाही. या सरकारचा आम्ही निषध करतो.ठेकेदारांनी येऊन भेटावे म्हणून सरकार प्रकल्प थांबवत असल्याचे कदम म्हणाले.
 
गेल्या पाच वर्षातील विकास कामांना स्थगिती देऊन महाविकास आघाडी कंत्राटदार आपल्याकडे येण्याची वाट पाहत आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विकास कामांना स्थगिती देणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.