खान्देशासाठी खुश खबर; रबर बलून बंधाऱ्यास केंद्राची मान्यता

    दिनांक : 10-Dec-2019
जळगाव : खान्देशच्या सिंचन क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविणारा आणि शेतकरी बांधवांच्या जिव्हाळाचा प्रश्न असलेल्या सात बलून बंधाऱ्यांना तातडीने मान्यता प्रदान करण्यात यावी यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी गेल्या पंधरवाड्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्रसिंग शेखावत,जल आयोगाचे अध्यक्ष आर के जैन, जलशक्ति मंत्रालयाचे प्रधान सचिव यू.पी.सिंग यांच्याकडे केलेल्या भक्कम पाठपुराव्याला आज अखेर यश मिळाले असून आज जल आयोगाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत सात बलून बंधाऱ्यांना मंजुरी मिळून गिरणा खोरे समृद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली आहे.

 
ल_1  H x W: 0 x
आज दिल्ली येथे केंद्रीय जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यू. पी. सिंग तसेच केंद्रिय जल आयोगाचे अध्यक्ष आर. के. जैन यांच्या अध्यक्षतेखाली गिरणा नदीवरील सात बलून बंधारे प्रकल्पाचे सादरीकरण झाले. यावेळी तापी पाट बंधारे महामंडळ कार्यकारी संचालक एस. डी. कुलकर्णी, सहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन पाटील, अधीक्षक अभियंता ए. एस. मोरे, कार्य.अभियंता पी. आर. मोरे, प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार इंजि. प्रकाश पाटील यांच्यासह भारत सरकारच्या वित्त विभागाचे प्रधान सचिव, जल आयोगाचे सदस्य संचालक पियुष रंजन, श्री.मुखर्जी, जल आयोगाचे वडोदरा कार्यालयअधीक्षक, केंद्रीय तांत्रिक सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते. आजच्या एकशे त्रेचाळीसाव्या बैठकीत सहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन पाटिल यांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण केले.
देशातील पहिला रबरयुक्त बलून बंधारा होणार  - खा. उन्मेश पाटील

ल_1  H x W: 0 x 
 
चाळीसगाव, पाचोरा, भडगाव यासह अर्धा जिल्हा सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी संजीवनी ठरणार असलेल्या प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांच्या मंजुरीसाठी जलशक्ति मंत्रालयाकडे सर्व पातळीवर पाठपुरावा करण्यात आलेला होता. अंतिम टप्प्यात असलेल्या या प्रकल्पाला आज मंजुरी मिळाली आहे. गेल्या अडीच वर्ष्याच्या मेहनतीला फळ मिळाले असून ना.नितीन गडकरी आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या सात बलून बंधारे प्रस्तावास आज केंद्रीय जल आयोगाचा हिरवा कंदील मिळाला असून देशातील महत्वाकांक्षी पहिला उबेर मेअर गेट अर्थात रबर युक्त बलून बंधारे प्रत्यक्षात साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.