तान्हाजी चित्रपटाचा मराठी ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक : 10-Dec-2019
मुंबई : शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ मावळे तानाजी मालुसरे यांच्या चरित्रावर आधारित अभिनेता अजय देवगणचा 'तान्हाजी - द अनसंग वारियर' या चित्रपटाचा हिंदीतील ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा मराठी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

t_1  H x W: 0 x 
 
'जसा मातीच्या प्रत्येक कणात एक पर्वत असतोया, प्रत्येक बीमध्ये एक जंगल, प्रत्येक तलवारीत एक सेना….तसाच प्रत्येक मराठ्यात दडला आहे लाख मराठा…', अशा दमदार डायलॉगसह चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी मनाला हा ट्रेलर चांगलाच भावला आहे.
या चित्रपटात अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत अभिनेत्री काजोल आणि उदयभानच्या भूमिकेत सैफअलीखान आहे. 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं' अशी गर्जना करत ते मोहीम फत्ते करण्यासाठी निघाले. त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर मावळ्यांनी किल्ला जिंकलासुद्धा; पण शत्रूशी बेभान होऊन लढताना हा सिंह धारातीर्थी पडला. त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आलंय.