साडे सात लाख चोरीचा मुद्देमाल फिर्यादीस पुन्हा सुपूर्द

    दिनांक : 10-Dec-2019
जळगाव: जळगाव येथे २७ सप्टेबर रोजी झालेल्या घरफोडीत चोरट्यानी लाखो रुपयाची मुद्देमाल व रोकड लंपास केली होती. त्या प्रकरणी जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला यश आले होते. सदर चोरीतील चोरट्यांना पकडून त्यांच्याकडील मुद्देमाल पोलिसानी हस्तगत केला होता. हा मुद्देमाल पोलिसांनी नेहेते कुटुंबियांना परत केला आहे. त्यामुळे नेहेते कुटुंबीय सुखावले आहे.

क_1  H x W: 0 x 
 
आज दि. ११ डिसेंबर रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ए.ए.पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात झालेल्या या चोरीत चोरट्यांनी जवळपास सात लाख रुपयाचा मुद्देमाल चोरला होता. यामध्ये दागदागिने व मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. जिल्हा पेठ पोलिसांच्या टीमने सापळा रचून चोरट्यांना पकडून बेड्या ठोकल्या. नेहेते कुटुंबीय या घटनेमुळे फार हादरून गेले होते. त्यांना आज स.पो.नी. भाग्यश्री नवटक्के यांच्या हस्ते ७ लाख ६६ हजार रुपयाचा चोरलेला मुद्देमाल परत करण्यात आला.
 
यावेळी कुटुंबीय यांनी पोलिसांचे आभार मानले. तसेच पो.नि. ए.ए.पटेल यांनी पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले व उपविभागीय पो. आ. निलाभ रोहन याचे मार्गदर्शन व नागरिकांच्या सहकार्यामुळे आम्ही हि मोहीम फत्ते करू शकलो असे सांगितले. या घटनेमध्ये आरोपी मोनुसिंग व त्याच्या दोन साथीदारास अटक करण्यात आले आहे.