पाळधी येथे आढळला १० फुटी अजगर; सर्पमित्राने दिले जीवदान !

    दिनांक : 10-Dec-2019
जामनेर :- सोमवार रोजी पहुर परिसरातील शेतकरी फकीरा नथ्थु घोंगडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये मोटार ठेवायच्या जागेवर बसलेल्या अजगराचे दर्शन शेतकरी फकीरा घोंगडे यांना घडले. सदर अजगराचे अगडबंब रूप पाहील्यानंतर त्यांनी तात्कळ पाळधी येथील नाना माळी या सर्पमिञाला बोलविले. त्यांनी या अजगरास पकडून सुरक्षित स्थळी सोडले.

प_1  H x W: 0 x 
 
सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असुन गहु, हरभरा आदी पिंकाना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शेती शिवारात गारव्यामुळे अनेक विषारी साप पाण्याच्या ठिकाणी वास करत असुन यामुळे शेतकऱ्यांना राञीच्या अंधारात संपदर्श होण्याचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितित शेतकऱ्यानी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाळधी सह परिसरात यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे बहुतांश ठिकाणी विहीर, कूपनलिकेला चांगले पाणी आले आहे . त्यादृष्टीने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, घेण्याकडे शेतकऱ्याचा कल वाढला आहे. सोमवार रोजी पहुर परिसरातील शेतकरी फकीरा नथ्थु घोंगडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये मोटार ठेवायच्या जागेवर बसलेल्या अजगराचे दर्शन शेतकरी फकीरा घोंगडे यांना घडले. सदर अजगराचे अगडबंब रूप पाहील्यानंतर त्यांनी तात्कळ पाळधी येथील नाना माळी या सर्पमिञाला बोलविले. त्यानंतर सर्पमिञ नाना माळी यांनी १० फुट लांबीच्या अजगरला पकडले. सर्पमिञ नाना माळी यांचे धाडस पाहुन शेतकऱ्यानी माळी यांचे आभार मानत कौतुक केले.
सर्पमिञाने जामनेर वन विभागाच्या वनक्षेत्रपाल समाधान पाटील यांच्या ताब्यात अजगरास दिले. अजगराला सुरक्षित अधिवासात सोडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच त्यावर प्रथमोपचार पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एल.राणे डॉ एस .एस व्यवहारे यांनी केले तसेच परिसरामध्ये साप आढळल्यास त्याच्यावर हल्ला न चढविता, त्याला न मारता सर्पमिञाच्या माध्यमातून जंगलामध्ये सोडण्याची व्यवस्था केल्यास अन्नसाखळी अबाधित राहुन त्यावर परिणाम होणार नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले .
"पाळधीसह परिसरात कोठेही मानवी वसाहतीत साप निघाल्यास मला माहिती देतात. आजपर्यंत कुणाकडून कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता जवळपास ७०० सापास पकडून वनअधिवासात सोडून दिले आहे. जेणेकरून पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण होत आहे. - नाना माळी, सर्प मिञ पाळधी"