धाकटा भाऊ अध्यक्ष, मोठा पंतप्रधान!

    दिनांक : 10-Dec-2019
वसंत गणेश काणे
 
एप्रिल 2019 मध्ये श्रीलंकेची राजधानी कोलंबो व अन्यत्र ख्रिस्ती प्रार्थनास्थळे आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये अनेक साखळी बॅाम्बस्फोट घडविण्यात आले. नॅशनल तौहीत जमात या गटावर संशय असला, तरी इतक्या मोठ्या पातळीवर स्वत:च्या भरवशावर विध्वंस घडवून आणण्याची या गटाची क्षमता नाही. आज इसिस, अल्‌ कायदा, लष्कर-ए-तोयबा आणि काही प्रमाणात अफगाण तालिबान हेच इतके सुनियोजित बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात. भारताने श्रीलंकेतील अधिकार्‍यांना संभाव्य दहशतवादी हल्ल्यांविषयी माहिती दिली होती, पण तिकडे दुर्लक्ष झाले होते.
 
 
मिंहद्रा व गोताबाया हे दोघे बंधू सिंहलीज-बुद्धिस्ट नॅशनलिस्ट पार्टीचे (एसएसएलपी) कणखर, पोलादी पुरुष अशी प्रतिमा असलेल्या गोताबायांचे थोरले बंधू मिंहद्रा राजपक्षे गेल्या निवडणुकीत हरले, त्यामागे भारताचा हात असल्याचे म्हटले गेले. हा आरोप का होत होता? त्यामागे कारणेही होती, श्रीलंकेतील तमिळांची अतिशय निर्दयपणे हत्या होत होती. ते जरी श्रीलंकेचे नागरिक होते, तरी भारत या कृत्याकडे तटस्थपणे पाहू शकत नव्हता. दुसरे असे की, गोताबाया राजपक्षे यांचे ज्येष्ठ बंधू मिंहद्रा राजपक्षे हे पक्के चीनधार्जिणे आहेत.
 
 
ज्येष्ठ बंधू मिंहद्रा राजपक्षे यांची गोताबाया राजपक्षे या कनिष्ठ बंधूंनी पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. पूर्वी आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत झालेल्या गृहयुद्धात मिंहद्रा राजपक्षे यांनी तमिळ बंडखोरांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांना श्रीलंकेत संरक्षक म्हणून तमिळेतर जनतेत अफाट लोकप्रियता मिळाली, पण निरपराधांचीही हत्या केली, असा ठपका त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ठेवला गेला. मागे एकदा भारतामुळेच आपला पराभव झाला, असे मानणारे व चीनकडे झुकलेले मिंहद्रा राजपक्षे हे आज पंतप्रधान झाले आहेत.
 

म_1  H x W: 0 x 
 
वडील बंधूंप्रमाणे गोताबाया राजपक्षे यांचीही प्रतिमा एक कणखर, न कचरणारा पोलादी पुरुष अशी आहे. चर्चमधील अमानुष िंहसाचाराने हादरलेल्या देशाने गोताबाया यांची तारणहार म्हणून निवड करावी, हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. आता हे दोघे भाऊ मिळून इस्लामी अल्पसंख्यकांनाही नमवतील, अशी अपेक्षा श्रीलंकेची जनता बाळगून आहे. श्रीलंकेतील राजकारणाच्या अभ्यासकांनीही ही शक्यता गृहीत धरली आहे. अशाप्रकारे लहान भाऊ अध्यक्ष व मोठा भाऊ पंतप्रधान असलेल्या श्रीलंकेसोबत भारताला यापुढे मित्रत्वाचे नाते निभवावयाचे, टिकवावयाचे, दृढ करायचे व वृिंद्धगत करायचे आहे.
 
 
ट्रम्प व राजपक्षे यांतील साम्य
 
गोताबाया राजपक्षे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपले प्रेरणास्थान मानतात. अमेरिकेचेही नागरिक असलेल्या गोताबाया यांनी तिथले नागरिकत्व सोडून अध्यक्षपदाची निवडणूक लढविली व िंजकलीसुद्धा. तसेच मुळात व्यावसायिक असलेल्या या दोन व्यक्ती अमेरिका व श्रीलंका यांच्या अध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. राजकारणात असे क्वचितच घडत असले, तरी राजकारणात काहीही घडू शकते, हे मान्य व माहीत असेल तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
गोताबाया राजपक्षे व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आणखीही एक साम्य आहे. ते असे की, ट्रम्प यांना जसा स्थानिक अमेरिकी श्वेतवर्णीयांचा पािंठबा मोठ्या प्रमाणावर मिळाला त्याचप्रमाणे गोताबाया राजपक्षे यांना मते देणार्‍यांत प्रामुख्याने स्थानिक िंसहली बुद्ध धर्मीय आहेत. मात्र, अध्यक्षीय निवडणुकीनंतर श्रीलंकेतील मतदारांमधला िंसहली व अन्य हा उभा दुभंग (व्हर्टिकल स्प्लिट) निर्माण झाला आहे. असा दुभंग भरून काढणे खूप कठीण जाते, मग ती व्यक्ती सौम्य असली िंकवा संबंधिताची तशी इच्छा असलीतरी. शिवाय मुळात अशी इच्छा आहे का, हाही प्रश्न आहेच.
 
 
 
लोकसंख्येचे वर्गीकरण
 
श्रीलंकेत 2011 च्या जनगणनेनुसार 70 टक्के बौद्ध, 13 टक्के िंहदू, 10 टक्के सुन्नी मुस्लिम, 6 टक्के रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन आणि इतर जेमतेम एक टक्का आहेत. हे धर्माधारित वर्गीकरण झाले. वंशानुसार वर्गीकरण करतो म्हटले, तर िंसहली 75 टक्के, लंकेतील तमिळ 11 टक्के, भारतीय तमिळ 4 टक्के व मुस्लिम मूर 9 टक्के आहेत. मूर लोकात स्थानिक, भारतीय व मलाय मूर असे वांशिक विभाजन आहे. स्वत: मूर लोक मात्र आपण मूळचे अरबस्थानचे आहोत, असे मानतात. श्रीलंकेत जवळजवळ 30 टक्के जनता बौद्धेतर आहे. हे लोक दैन्य व दारिद्र्यात जीवन कंठत असून, ते मूळ राष्ट्रीय प्रवाहापासून दूर व दूरत्व राखून असल्यामुळे श्रीलंकेतील समाजजीवनात अस्वस्थता कायम राहील. हे बंद झालेच पाहिजे. त्याशिवाय श्रीलंकेत स्थायी शांतता निर्माण होणार नाही, हे स्पष्ट आहे.
 
 
राजपक्षे बंधूंसमोरील दोन अडचणी
 
राजपक्षे बंधूंसमोर दोन मुख्य अडचणी आहेत. एक म्हणजे दोघेही उग्र स्वभावाचे आहेत. मूळ स्वभावाला मुरड घालून नरमाईचे वागणे, बोलणे अशक्य नसले तरी चांगलेच कठीण असते. दुसरे असे की, त्यांचा मताधारच मुळी त्यांच्या तमिळ बंडखोरांवरच्या कठोर कारवाईमुळे आकाराला आला आहे. तिने प्रसंगी क्रूरपणा धारण करून केलेल्या कारवाईकडे व निरपराधांच्या हत्याकांडांकडेही दुर्लक्ष केले आहे. श्रीलंकेच्या अध्यक्षपदी गोताबाया राजपक्षे यांची पुन्हा निवड झाल्यानंतर तपास करणारे पोलिस अधिकारी निशांता सिल्वा आदींना धमक्या मिळत गेल्या. त्यातील काही तपास प्रकरणांत गोताबाया राजपक्षे यांचाही समावेश होता. त्यामुळे सिल्वा आदींनी पोबारा केल्याचे वृत्त समोर आले आहे.
 
भारतच श्रीलंकेचा सच्चा मित्र
 
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर तातडीने श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेले होते. चीनची श्रीलंकेशी वाढलेली जवळीक कमी करण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे, हे उघड आहे. मोठा भाऊ मिंहद्रा राजपक्षे चीनशी जवळीक साधणारा आहे, तर धाकटा डोनाल्ड ट्रम्प यांचा भक्त आहे. दोन भावांपैकी कोण कुणाचे मतपरिवर्तन करणार, ही बाब भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. खरेतर सर्व दहशतवादविरोधी देशांची मजबूत आघाडी गठित करून दहशतवाद खणून काढणे, हे पहिले पाऊल असले पाहिजे. गोताबाया राजपक्षे यांनी सर्वप्रथम भारताला भेट दिली आहे. भारताने आपल्याकडून विकासकामांसाठी 40 कोटी डॉलर्सचे कर्ज, दहशतवाद्यांशी लढण्यासाठी 5 कोटी डॉलर्सची मदत व पोलिस अधिकार्‍यांना प्रशिक्षण देऊ केले आहे, त्याचबरोबर तमिळांची अपेक्षापूर्ती व्हावी, अशी भूमिकाही व्यक्त केली आहे. चीन आणि श्रीलंका यात भौतिक अंतर खूप जास्त आहे. चीनचा प्रयत्न श्रीलंकेला कर्जबाजारी करण्याचा असला, तरी तसेच कर्जपरतफेडीचा हप्ता चुकल्यामुळे हंबनटोटा बंदर चीनच्या ताब्यात आले असले, तरीही मनाने ते जवळ येत आहेत. भारत व श्रीलंकेतील भौतिक अंतर खूप कमी आहे व भारतच श्रीलंकेचा स्वाभाविक मित्र असला, तरी सध्यातरी ते मनाने एकमेकांपासून दूर आहेत. अख्खे तामिळनाडू राजपक्षे बंधूंवर तमिळांच्या शिरकाणामुळे खूपच नाराज आहे. हा दुरावा दूर करण्यासाठी राजपक्षे बंधू कोणती भूमिका घेतात व पावले उचलतात, इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण, त्याशिवाय भारत व श्रीलंका यात खरी मित्रता निर्माण होणार नाही, हे स्पष्ट आहे.
 
9422804430