विश्वासदर्शक ठरावात महाविकास आघाडी पास !

    दिनांक : 30-Nov-2019
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. 169 आमदारांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारला मिळाला आहे. यावेळी एमआयएमचे 2, मनसेचे 1, सीपीआयएच्या एका आमदाराने यावेळी तठस्थ भूमिका घेतली. तर भाजपने सभागृहातून सभात्याग केल्याने या प्रस्तावाच्या विरोधात शुन्य मतं पडली. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. तर राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि जयंत पाटील या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
 

 
उद्धव ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजपच्या सर्व आमदारांनी वॉक आऊट केले. सभागृहाच्या बाहेर भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली. प्रोटेम स्पीकर बदलणे हे असंवैधानिक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देशात याआधी असे कधीच झाले नाही. महाआघाडीला अशी काय भीती होती. ज्यामुळे त्यांनी हंगामी अध्यक्ष बदलला. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडल्यानंतर फ्लोर टेस्ट घेतली जाते. जो पर्यंत स्थायी अध्यक्षांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत विश्वास दर्शक ठराव मांडला जावू शकत नाही. असे देखील फडणवीस म्हणाले.