देशात रक्तपेढ्यांची संख्या ३२६३ तर राज्यात ३४०

    दिनांक : 30-Nov-2019
मुंबई: राज्यातच नव्हे तर देशभरात वाढते अपघात चिंतेची बाब आहे.  विविध आजारात व अपघातात रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. असे असताना देशात केवळ ३२६३ इतक्याच रक्तपेढ्या असल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

 
 
मंत्री अश्विन कुमार यांनी दिलेल्या माहितीमध्ये देशभरात ३२६३ इतक्या रक्तपेढ्या कार्यरत असून त्यापैकी महाराष्ट्रात ३४० रक्तपेढ्या कार्यरत आहेत. देशातील ७१ जिल्ह्यांमध्ये आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी रक्तपेढ्या नाहीत असे ते म्हंटले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रक्तपेढ्या सुरु आहेत असेही त्यांनी सांगितले आहे. सार्वजनिक आरोग्य हा राज्याच्या अखत्यारीतील विषय असल्याने रक्तपेढ्या स्थापन करण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांवर असते. राष्ट्रीय आरोग्य मिशन कार्यक्रमाद्वारे केंद्र सरकार रक्तपेढ्या उभ्या करण्याच्या प्रयत्नात मदत पुरवते. यासाठी राज्याकडून प्रस्ताव येणे गरजेचे असते. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
त्यामुळे अपघाताच्या समस्येवर चर्चा करताना राक्त्पेद्यांच्या संख्येत वाढ होण्याची आवश्यकता या माहितीतून स्पष्ट होत आहे. विविध संस्था, सामाजिक संस्था यांना प्रोत्साहन देऊन रक्तदान करण्याचीही नितांत गरज निर्माण झाली आहे. करण, रक्तपेढ्यांमध्येही बऱ्याचदा रक्त उपलब्ध नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागण्याच्या घटना घडल्या आहेत.