महिलांनी संघटित होऊन कार्य केल्यास त्या खाजगी आयुष्यात सुद्धा यशस्वी होतात- अॅड.शुचिता हाडा

    दिनांक : 27-Nov-2019
 
क्रीड़ा क्षेत्रातील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे संघटन-संघ भावना. होय या गुणा मुळेच महिला आपल्या जीवनात सुद्धा यशस्वी होतात. तुम्ही ह्या क्षेत्रात आपले करिअर बनवा व खुश रहा, असे गौरवोदगार मनपा स्थाई समिती सभापति अॅड. शुचिता हाड़ा यांनी काढले. त्या राज्य स्तरीय महिला खुला गटातील हॉकी स्पर्धेला पुणे येथे जाणाऱ्या जळगाव जिल्हा संघास छत्रपती शिवाजी महाराज  संकुलात निरोप देताना बोलत होत्या.
 

 
 
यावेळी  वेळी व्यासपीठावर हॉकी महाराष्ट्रच्या सह सचिव प्रो. डॉ. अनिता कोल्हे, जळगाव हॉकी सचिव फारूक शेख व प्रशिक्षक लियाकत अली, त्याच सोबत बास्केटबॉल मुख्य पंच वाल्मीक पाटिल, फुटबॉल असो. चे अब्दुल मोहसिन, टेबल टेनिस असो. चे विवेक आडवाणी, बुद्धिबळ संघटनेचे प्रवीण ठाकरे आदी उपस्थित होते.
 
प्रस्तावीक फारूक शेख यांनी तर आभार लियाकत अली यांनी मांडले. सूत्र संचालन वाल्मीक पाटिल यांनी केले.
संघास हॉकी जळगाव चे इम्तियाज़ शेख, प्रो. डॉ. शमा सराफ, अकील शेख, विनया जोशी, मोहम्मद आबिद, सुरेखा पाटिल आदिनी शुभेच्या दिल्या.
संघाच्या कर्णधारपदी कोमल सोनवणे तर उप कर्णधार पदी नूतन शेवाळे यांची निवड करण्यात आली. या संघामध्ये त्त्यांच्यासोबत 
निवड झालेले खेडाळूमध्ये पूजा मोहरकर, दीपिका सोनवणे, सायली खंडागळे, निशा कोंढाळकर, रुपाली मराठे, प्रतीक्षा माळी, निशा सपकाळे, भाग्यश्री कोळी, सुनैना राजपाल, मोहिनी माळी, यामिनी पाटील, आसमा शेख, हेमांगी पाटील, स्वाती पाटील, हिमालि बोरोले आदी जानिनीची निवड करण्यात आली आहे.