कुपोषण मुक्तीसाठी व्हाउचर योजनेस प्रारंभ सुरू

    दिनांक : 26-Nov-2019
नंदुरबार : राज्यातील एक हजार गावे आदर्श करण्याच्या संकल्पेनेंतर्गत जिल्हा कुपोषण मुक्त करण्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्यासाठी पोषण इंडिया प्रोग्रॅम अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. रॅकेट बेंकैझर, महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन अभियान आणि प्लॅन इंडियातर्फे हा उपक्रम सुरू केला आहे. पोषण इंडिया कार्यक्रम महिला आणि बाल विकास आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात ही योजना कार्यान्वित केली आहे.
  
पोषण इंडिया कार्यक्रमाचा उद्देश माता आणि बाळाच्या पोषण आणि आरोग्यात सुधारण्यासाठी असलेल्या व्हाउचर योजनेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल गौंडा आदी उपस्थित होते.
 

 
 
 
काय आहे योजना ?
 
व्हाउचर योजनेंतर्गत उच्च जोखमीच्या दोनशे गर्भवती माता आणि चारशे सॅम बालकांसाठी वित्तीय सहायतेची तरतूद आहे. या योजनेंतर्गत उच्च जोखमीच्या गर्भवती मातांना तीन दिवस अगोदर प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करणे, रुग्णालयात जास्तीत जास्त दिवस राहून काळजी घेणे, सॅम बालकाला चौदा दिवस पोषण पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात येईल. त्यातून त्यांच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेतली जाईल.
 
कुपोषणाबाबत अपेक्षित बदल समाजामध्ये घडवून आणण्यासाठी व्हाउचर योजनेची सुरवात करण्यात आली आहे.
व्हाउचर योजना ग्राम स्तरावर कार्यान्वित होत आहे. वैद्यकीय अधिकारी, ए. एन. एम., आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक पोषण कार्यकर्ती आणि कॅल्स्टर समन्वयक यांच्या सोबत जोडल्या आहेत. यांची अद्ययावत माहिती पोषण इंडिया कार्यक्रम अँपवर संकलित होईल. व्हाउचर योजनेत रोख रक्कम देण्याची सुद्धा तरतूद क
रून लाभार्थींचे खाते उघडण्यासाठी पोस्ट पेमेन्ट बॅंकेशी नेटवर्किंग करण्यात आले आहे. तसेच लाभार्थींच्या घरी जाऊन खाते उघडण्याचे कार्य गाव पातळीवर करण्यात येणार आहेत. व्हाउचर योजने अंतर्गत लाभार्थींची वास्तविक अडचण लक्षात घेता परिवहनासाठी भत्ता, जेवणाचा खर्च तसेच बुडीत मजुरीची तरतूद करण्यात आली आहे.
 
व्हाउचर योजनेमुळे लोक सहभागाला चालना देऊन अशासकीय संस्था, पंचायती राज संस्थान यांच्या सहभागाची खात्री सुनिश्‍चिती करण्यात येणार आहे. व्हाउचर योजनेच्या माध्यमातून सक्षम, सक्रिय आणि लोकसहभाग सुनिश्‍चित करून कुपोषण मुक्त करण्याच्या आंदोलनात व्हाउचर योजना ही यशस्वी ठरेल, असा विश्‍वास श्री. भारुड यांनी व्यक्त केला