सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत महाराष्ट्राचा पहिला विजय

    दिनांक : 25-Nov-2019
सय्यद मुश्ताक अली चषक महाराष्ट्राच्या नावे; बडोदा संघ पराभूत
सूरत - दमदार फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजी यांच्या जोरावर महाराष्ट्राने सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत बडोद्यावर ६७ धावांनी विजय मिळवला. सुपर लीगमध्ये 'अ' गटात महाराष्ट्राचा दुस-या सामन्यातील हा पहिला विजय ठरला. सोमवारी महाराष्ट्राची पुढील लढत राजस्थानविरूध्द होईल.
 

 
विजयासाठी १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बडोद्याचा डाव १७.३ षटकांत ९८ धावांत संपुष्टात आला. बडोद्याकडून फलंदाजीत केदार देवधरने सर्वाधिक २७ धावा केल्या. महाराष्ट्राकडून गोलंदाजीत समद फल्ला, सत्यजित बच्छाव, शामशुझमा काझी आणि अझीम काझीन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
 
तत्पूर्वी, महाराष्ट्राचा कर्णधार राहुल त्रिपाठीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २० षटकांत २ बाद १६५ धावा केल्या. महाराष्ट्राकडून सलामीवीर त्रतुराज गायकवाडने ४७ आणि विजय झोलने २० धावा केल्या तर केदार जाधवने नाबाद ४७ आणि अझीम काझीने नाबाद ४८ धावा केल्या. बडोद्याकडून रिशी अरोठे आणि स्वप्नील सिंगने प्रत्येकी १ गडी बाद केला.