शिक्षकांची सेवानिवृत्तीनंतरही कार्यमग्नता भूषणावह - खा. उन्मेश पाटील

    दिनांक : 25-Nov-2019
शिक्षकांची सेवानिवृत्तीनंतरही कार्यमग्नता भूषणावह - खा. उन्मेश पाटील
सेवानिवृत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संस्थेचे जेष्ठतम सेवानिवृत्त शिक्षक सदस्यांचे सत्कार संपन्न
चाळीसगाव: शिक्षण या नोबलसेवा व्यवसायात आयुष्य वेचलेले सेवानिवृत्त गुरुजनांनी वयाच्या उत्तरार्धात देखील आपली कार्यमग्नता सुरूच ठेवली आहे. सरस्वतीच्या तपश्चर्येतून मिळविलेले ज्ञानाचे भांडार समाजाला शेवटच्या श्वासापर्यंत देण्याची त्यांची तळमळ भूषणावह असून संस्थेच्या भरभराटीसाठी माझे नक्कीच प्रामाणिक प्रयत्न राहतील. अशी ग्वाही देत ख. उन्मेश पाटील यांनी निवृत्त शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त केला.
 

 
 
सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय महाविद्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्त माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संस्था आयोजित जेष्ठतम सेवानिवृत्त शिक्षकांच्या सपत्नीक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार उन्मेश पाटील बोलत होते.
खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की समाजकारण असो की राजकारण सज्जन शक्ती सक्रिय झाली पाहिजे. समाजात बदल हवा असेल तर आपल्याला सकारात्मकता वाढवावी लागेल, आज सेवा निवृत्त होऊन ही आपण सर्व शिक्षक तारुण्याला लाजवेल अशी धडपड करतात यातून आम्हाला प्रेरणा मिळते. आपल्या मार्गदर्शनातून व आशीर्वादातून समाजाची चांगली सेवा करू असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. संस्थापक अध्यक्ष ल बा सोनार यांनी खासदार उन्मेश पाटील यांची मुखत्कंठाने प्रसंशा केली.विद्यार्थी दशेपासून जनतेच्या सेवेची तळमळ असलेले उन्मेश पाटील देशात मतदारसंघाचे नाव उज्वल करतील असे ते म्हणाले .
वयाची पंचाहत्तरी गाठलेले सेवा निवृत्त शिक्षक सर्वश्री भास्कर महाजन, गोविंद वाणी,सुखदेव चव्हाण, बाळकृष्ण बच्छाव, यांचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी धुळ्याचे जेष्ठ शिक्षण तज्ञ इतिहास कार मधुसुदन मिश्रा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे जेष्ठ सिनेट सदस्य दिलीप दादा पाटील, संस्थापक अध्यक्ष ल बा सोनार सर, सचिव मनोहर पंडित, उपाध्यक्ष श्रीराम पवार,सह सचिव अशोक शिंपी, प्रायोजक लक्ष्मण वाणी कुंझरकर ,योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, रा वी संचालक माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, एल डी चव्हाण, ए ओ पाटील, प्राचार्य एस आर जाधव ,रा वी संचालक सुधीर पाटील यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.