क्रिकेट आणि राजकारणात काहीही शक्य...

    दिनांक : 25-Nov-2019


कीअसे म्हणतात की वेळ खूप बलवान आहे, वेळ कोणासाठीही थांबत नाही. सध्याच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील रोचक घडामोडी पाहता असे म्हणता येईल. असो, काही दिवसांपूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, क्रिकेट आणि राजकारणात काहीही शक्य आहे. त्याची प्रचिती पुन्हा आली. शनिवारी पहाटेच्या पहिल्या किरणातून राजकीय भूकंपाचा धक्का जाणवला. अचानक झालेल्या हादर्‍यामुळे राजकीय अणुभट्टीवर भूकंपाची तीव्रता मोजणारी सर्व उपकरणे कोलमडली. त्यावेळी नितीन गडकरी यांच्या विधानाची विरोधकांनी खिल्ली उडविली असावी, पण गडकरी थट्टा करीत नाहीत हे आता विरोधकांनाही समजले असेल.
 
 
शुक्रवारी सकाळी 11 ते 8 या दरम्यान देशाचे राजकारण, विशेषत: महाराष्ट्रात असा खेळ होता, ज्याची भाजपाच्या बड्या नेत्यांनी कल्पनाही केली नव्हती. सकाळच्या भाषणानंतर वृत्तपत्रातील पानांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर राज्यातील लोक संमतीची बातमी वाचत होते, त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी आठ वाजेपर्यंत मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली होती.
 
 
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या या भूकंपाकडे अधिक लक्ष दिले जात आहे, कारण हे सर्व भाजपसाठी किंवा केंद्रातील भाजप सरकारच्या काळात घडत आहे. इतिहासात अशा बर्‍याच घटना घडल्या आहेत, ज्या याप्रसंगी लक्षात ठेवण्याची गरज आहे. शिवसेना नेहमीच आपल्या फायद्यासाठी राजकारण करत असते. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना केली. भविष्यात निर्णायक भूमिका बजावण्याच्या उत्सुकतेने महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर बाळासाहेबांनी इंदिरा गांधींच्या विरोधात 1971 मध्ये स्थापन झालेल्या ’काँग्रेस ओ’ नावाच्या नव्या गटाशी आघाडी केली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 5 उमेदवार उभे केले होते, यापैकी एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचे औचित्य मान्य केले होते.
 
अनिष्ट आघाडीची शिवसेनेची परंपरा जुनीच
मराठी व्यक्ती म्हणून प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देतांना त्यांना नैतिकता किंवा संधीसाधू आठवला नाही, मग आज संताप का ? असा प्रश्न पडतो. इतकेच नव्हे तर, शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी आणि इस्लामविरोधी म्हणून ओळखली जात असतांनाही, तडजोड करण्यास मागेपुढे पाहिले नाही. कदाचित हे विचित्र वाटेल पण वास्तव आहे. की सन 1978 मध्ये शिवसेनेने आपला कट्टर शत्रू इंडियन युनियन मुस्लिम लीगशी युती केली होती. शिवसेनेने मनोहर जोशी यांना क्रॉस व्होटिंगद्वारे महापौर बनवले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे मुस्लिम लीगचे नेते गुलाम मोहम्मद बनातवाला यांच्यासह व्यासपीठावर एकत्र होते.
 
काय झाले? ते कसे झाले? कधी झाले ? आदी यक्षप्रश्नांसह छत्रपती शिवाजी महाराज, खंजिर, गद्दारी असे शब्द दिवसभर सुरूच होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलावले आणि घाईघाईने पत्रपरिषदेचा समारोपही करण्यात आला. संतप्त नेताजींनी आमदारांची मीडिया परेडही केली. रात्री पाप केले जाते आणि फर्जिकल स्ट्राइक असे सांगत उद्धव यांनी सरकारच्या शपथविधीवर भाष्य करीत संताप व्यक्त केला. पण त्यानंतर लगेचच काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सभा चर्चेच्या फे.र्‍यांनंतर सत्ता स्थापनेसाठी झालेल्या गेल्या पंधरा दिवसातील विलंबाचा चेंडू राष्ट्रवादी-शिवसेनेच्या कोर्टात टाकला. आता पुन्हा मंथन अवस्थेदरम्यान आम्ही सर्व एकत्र आहोतचा धोषा लावला जात आहे.
 
 
संधीसाधूपणा सांगायचा तर 1977 आणि 1980 च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दर्शविला. हे सर्व शक्य झाले कारण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचे घनिष्ट संबंध होते. शनिवारी महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच या गोष्टींच्या नैतिकतेची आठवण करण्यास सुरुवात करणारे शिवसेनेचे नेते 2007 मध्ये एनडीएचा भाग असूनही, शिवसेनेने राष्ट्रपदीपदासाठी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता.
 
 
इतिहासावरून आपण आता भाजपा- शिवसेना युतीच्या नात्याकडे आलो आहोत, येथे हे समजून घेणे आवश्यक आहे की, पूर्वी राज्यात भाजपाची लहान भावाची भूमिका होती. युतीमध्ये ज्याला कमी जागा मिळते त्याला धाकटा भाऊ म्हणतात. याच कारणामुळे 1995 मध्ये मनोहर जोशी आणि 1999 मध्ये नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. बाळासाहेब ठाकरे यांनी आघाडीच्यावेळी स्पष्ट केले होते, की जास्त जागा असलेल्या पक्षालाच मुख्यमंत्रीपद मिळेल. परिणामी 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाला 46 तर शिवसेनेला 45 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपाला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. एकनाथराव खडसे विरोधी पक्षनेते म्हणून निवडले गेले. युतीचा जुना फॉर्म्युला उलटून शिवसेनेनेही आपली महत्त्वाकांक्षा दर्शविली आहे. गेल्यावेळी 2014 पासून या विधानसभा निवडणुका होईपर्यंत शिवसेना राज्यात कथित ’धाकटा भाऊ’ या भूमिकेत आली आहे.
 
 
युती धर्माचे पालन न करता ‘आता नाही तर कधीच नाही’ या भूमिकेने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा मोह झाला होता. हे लक्षात घेतले पाहिजे की, शिवसेना आणि तिची नवीन काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळलेली युती हा संधीसाधूपणाचा प्रकार असून त्यांना राज्यातील शेतकर्‍यांच्या समस्या किंवा अन्य बाबींशी काही घेणेदेणे नाही. तीन विसंवादी पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठी बैठका घेऊन राज्यातील जनतेला फसवत आहेत. माहिती क्रांतीच्या युगात वेगवान इंटरनेट प्रणाली असूनही, मुंबईतून दिल्लीच्या प्रतिनिधींकडे आमदारांची यादी घेऊन जाणे हास्यास्पद वाटते. या मालिकेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटूंबातील व्यक्तींना प्रोजेक्ट करण्याची वेदना लपून राहू शकत नाही.
 
 
शनिवारी महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडले ते कर्नाटकात व गेस्ट हाऊस घोटाळा आणि 1995 पूर्वी घडले आहे. मायावतींनी भाजपाला पाठिंबा न दिल्याने मुलायम सिंग यांच्या कार्यकर्त्यांनी मायावतींवर हल्ला कसा केला हे विसरता येत नाही. दुसर्‍या एका राजकीय नाट्यात कर्नाटकात एन. धरम सिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेस-जेडीएस सरकारला रात्रीतून काढून टाकले गेले आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात भाजपबरोबर मुख्यमंत्री बनले.
 
 
त्यावेळी माजी पंतप्रधान एच.डी.देवगौडा यांनी मौन धारण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री झालेला एचडी कुमारस्वामीही आपल्या वडिलांची फसवणूक करीत आहे, असे सांगत लोकांसमोर अश्रू ढाळत होता. हे सर्व फार काळ चालू शकले नाही आणि सर्वांना कळले की माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनविण्यासाठी ही चाल खेळली होती.
 
 
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते कीे, देवेंद्र फडणवीस हे आपल्या नेतृत्वात येत्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या विकासाला अधिक उंचीवर आणतील, अशी मला खात्री आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने विशेष करुन संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या सरकारच्या अपेक्षांवर टीका केली होती.
 
 
सध्याच्या महाराष्ट्रातील गतिरोध आणि अनिश्चिततेच्या सर्व शंका फेटाळून लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जोडीने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पदावर बसविले. सध्या या सर्व बाबीकडे लक्ष देण्यासारखे आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा संधीसाधूपणातून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले. सत्ता स्थापनेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडण्यास तयार असलेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा नैतिक गोष्टी आठवल्या.
 
 
राज्यातील जनतेच्या जनमताचा आदर करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सरकार स्थापनेत एक विश्वासू लहान भाऊ, चांगले विरोधक आणि शिवसेनेची भूमिका निभावली असती तर बरे झाले असते. आता आमदारांवर लक्ष ठेवणे,विधिमंडळ पक्षनेते पदावरून अजितदादाला दूर करणे, कोर्टाचे दरवाजे ठोठावणे या सर्व बाबी सत्तेचा लोभ नव्हे तर अन्य काय दर्शवितात. ?
 
 
सर्वांचे लक्ष आता 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिध्द करण्याकडे लागले आहे. निश्चितच अजितदादांनी काही ठोस पत्ते हातात ठेवूनच भाजपला पाठिंबा दर्शविला असेल. सुप्रिया सुळे आणि परिवारासमोर नेहमीच दुय्यम मानले गेलेले अजितदादा हे सुध्दा कच्चे खेळाडू नाहीत. सततची उपेक्षा हे त्यांचे दु:ख आहे. भाजप नेतृत्वाने उचलेले हे पाऊल सामान्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्या दिल्यानंतरच्या काळात जे नाट्य घडले त्यावेळेच्या भाजपाच्या मौनाचा अर्थ भल्या-भल्या राजकीय पंडितांनाही उमगू शकला नाही हे विशेष.

 
 

 
- विशाल चड्ढा/7588518744