शरद पवार बोलत नाहीत, "पर ये अंदर कि बात है" - आमदार रवी राणा यांचे सूचक वक्तव्य

    दिनांक : 24-Nov-2019
 

मुंबई : आपले आमदार फुटू नयेत म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सावधगिरी बाळगत आपल्या आमदारांना सुरक्षितस्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप होणार आहे. शिवसेनेचा एक गट फुटून भाजपसोबत येणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.

 

 
 
 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जरी सांगितले की ते भाजपसोबत नाहीत, तरी ये अंदर की बात हैं… समय बतायेगा, असं सूचक वक्तव्य रवी राणा यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या वर्तावा फिरू लागल्या असताना आ. राणा यांच्या विधानामुळे अधिक खळबळ वाढली आहे. 

 

मागील १५ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार येणार असल्याचा अंदाज रवी राणा यांनी वर्तवला होता. त्यांचा हाच अंदाज आता खरा ठरतोय की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे रवी राणा यांच्या नव्या दाव्याने सध्या अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

दरम्यान, आमच्याकडे बहुमताचा १७५ चा आकडा आहे. आमची यादी तयार आहे. राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.