वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभारा विरोधात शिवसेनेचे आंदोलन

    दिनांक : 22-Nov-2019

वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभारा विरोधात शिवसेनेचे आंदोलन

 

जळगाव: जळगाव शहरातील रिक्षा चालक व वाहतूक पोलीस यांच्यातील वाद काही जुना नाही. शहरातील वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे रिक्षा चालक अडचणीत असल्याचे कळताच शिवसेना तालुका प्रमुख यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

 

 
 

जळगाव व परिसरातिल रिक्षा चालक आपल्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतात. त्यांना काही दिवसांपासुन वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला सामोरे जावे लागत होते. ही बाब शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते दिपक साळवे यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेत सर्व रिक्षा चालकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वाहतूक पोलिसांच्या तक्रारीचा पाढा वाचला. अप्पर जिल्हाधिकारी सो यांनी या प्रकरणी मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने रिक्षाचालक व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

 

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते दिपक साळवे, नामदेव पाटील, उत्तम पाटील, रवी कोळी, नाना महाजन, भैय्या पाटील, गोपाल पाटील, संदीप पाटील, किरण पाटील, संदीप पाटील, सागर पाटील, विनोद काळे, पाळ्धी पोलिस पाटील सुरेश महाजन, शिवा धनगर यांसह रिक्षाचालक उपस्थीत होते. रिक्षा चालकांच्या समस्यांना वाचा फोडल्यामुळे सर्व रिक्षा चालकांनी तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांचे आभार मानले.