सुर आले जुळुनी!

    दिनांक : 22-Nov-2019

 
 
 
मुंबई, 21 नोव्हेंबर
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक संयुक्त आघाडी स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने शिवसेनेसोबत जाण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर, शिवसेनाण काँग्रेस आणि राकाँच्या नेत्यांची बैठक शुक्रवारी 4 वाजता मातोश्रीवर होणार असून, त्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
 
 
शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत पाचारण केले आहे. काँग्रेसनेही आपल्या आमदारांची नेता निवडीसाठी मुंबईत बैठक बोलावली असून, या सर्व आमदारांना जयपूर येथे हलविले जाण्याची शक्यता आहे.
 
 
राज्यात भाजपाला बाजूला सारत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेने एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी आखलेली रणनीती प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहे. दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आठवडाभर खलबते झाल्यानंतर काँग्रेसने राकाँला शिवसेनेसोबत जाण्यासाठी अनुकुलता दर्शविली आहे. त्यामुळे राज्यात एक नवे सत्ता समीकरण अस्तित्वात येणार आहे. राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पुढील आठवड्यात दावा करणार असल्याने सर्व आमदारांची ओळखपरेड आणि त्यांची ओळखपत्र तपासणी या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांना मुंबईत शुक्रवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. काँग्रेस पक्ष आपल्या आमदारांची बैठक आयोजित करून आपल्या विधिमंडळ नेता निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर काँग्रेस आणि राकाँ नेत्यांची बैठक पार पाडून, सायंकाळी दोन्ही काँग्रेस पक्षाचे नेते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना एकूण चर्चेचा सार सांगून, सत्ता (पान 2 वर)