पिसावर ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमा अनावरण

    दिनांक : 22-Nov-2019

पिसावर ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमा अनावरण 

नंदुरबार: पिसावर येथे ग्रामपंचायत कार्यालयात २१ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरणाचा सोहळा झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुकरमुंडाचे माजी सरपंच डॉ.विजय पटेल हे उपस्थित होते. प्रतिमा अनावरण पिसावरचे सरपंच अशोक लाश्या ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 
 
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच बबन धुडकू पानपाटील, सदस्य राजेंद्र विक्रम पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव बन्सी ओंकार पाटील, तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष दामोदर देवचंद ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रसिंग भिल, भगवान भिल, छोटू भिल, संगणकतज्ञ सचिन पानपाटील, उत्तम भिल आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमा अगोदर नंदुरबार, तळोदा व शहादा येथील श्री समर्थ बैठकीच्या ६५ सदस्यांनी संपूर्ण गावभर स्वच्छता अभियान राबवून ३ टन कचर्‍याचे संकलन केले. त्यानंतर संपूर्ण परिसरात रांगोळ्या, फुलांची सजावट, ग्रामपंचायत कार्यालय सजावट आदींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 
या सोहळ्याची सुरुवात स्वागतगीताने झाली. श्री गणेश पुजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकेतून उत्सव प्रभाकर पाटील यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवंदडा ता. अलीबाग, जि.रायगड व श्री समर्थ बैठक याबाबतची माहिती विशद केली. सत्कार समारंभानंतर डॉ.अरुण नानासाहेब देसले, मंगला रविंद्र महाले, विजय भगवान चौधरी यांनी मनोगतातून प्रतिष्ठानच्या वतीने केल्या जाणार्‍या स्वच्छता अभियान, स्मशानभूमी, कब्रस्तान स्वच्छता, वृक्ष लागवड व संवर्धन, जलपुनर्भरण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, साक्षरता वर्ग यासारख्या विविध कार्यांची माहिती सांगितली. या सोहळ्यात संपूर्ण जिल्ह्यातील श्री सदस्य, गावातील व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रविण देसले यांनी व आभार रविंद्र मोतीराम महाले यांनी मानले. यशस्वीतेसाठी गावकर्‍यांनी परिश्रम घेतले.