विश्वशांती धर्म सोहळ्याचे वेरूळलाआज होणार ध्वजारोहण

    दिनांक : 17-Nov-2019

स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती
यावल : जय बाबाजी भक्त परिवाराचे राजधानी आश्रम म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र वेरूळ येथिल आश्रमात १ ते ९ डिसेंबर पासून सलग ९ दिवस विश्वशांती धर्म सोहळा होणार आहे. सोहळ्यादर
म्यान भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे ध्वजारोहण श्रीक्षेत्र वेरूळ येथील आश्रमात सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी आश्रमीय संतांसह राज्यभरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे.
जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या तिसाव्या पुण्यस्मरणा निमित्त उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी परम पुज्य सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत श्रीक्षेत्र वेरुळ येथे १ ते ९ डिसेंबर दरम्यान ’विश्‍वशांती धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या दरम्यान महाजपानुष्ठान,अखंड नंदादीप, महिला जप, श्री सद्गुरू शिवदत्त पंचायत महायज्ञ,हस्त लिखित नामजप,नामसंकीर्तन अर्थात ओम जनार्दनाय नमः या महामंत्राचा अखंड गजर यांसह रोज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर नित्यनियम विधी, प्राणायाम,ध्यान,भागवत वाचन, महाआरती, भजन, प्रवचन,सत्संग, भव्यदिव्य सोहळ्याचे ध्वजारोहण राज्यभरातील विविध जिल्ह्यातील हजारो भविकांच्या उपस्थितीत सोमवारी होणार आहे.ध्वजारोहण सोहळ्याचा प्रारंभ पहाटे ५ वाजता ब्रम्हमुहूर्तावरच्या नित्यनियम विधी,प्राणायाम,ध्यान,एकनाथी भागवत वाचन,महाआरती यानंतर जगदगुरु बाबाजींच्या सवाद्य पालखी मिरवणुकीबरोबर सकाळी ठीक ९ वाजेपासुन ब्रम्हवृंदाच्या मंत्र घोषात विश्वशांती धर्म सोहळ्याचे ध्वजारोहण शुभारंभ होईल. यावेळी श्री बाबाजींच्या चरण पादुका पूजन,संत-ब्राम्हण अतिथी आणि धर्मध्वज पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होईल. भविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.