पहूर ग्रामीण रुग्णालयातील सेवा एक महिन्यांपासून ठप्प, रूग्णांचे हाल

    दिनांक : 17-Nov-2019
 
 जिल्हाधिका-र्यांची भेट ठरली निष्फळ
तभा वृत्तसेवा
पहूर ता.जामनेर दि. १७- वैद्यकिय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे येथील ग्रामीण रूग्णालयाची सेवा गेल्या एक महिन्यांपासून बंद असल्याने गोर- गरीब रुग्णांचे मोठया प्रमाणात हाल होत आहेत . दरम्यान जिल्हाधिकारी डॉ . अविनाश ढाकणे यांनी भेट देवून आठवडा उलटला तरी एकही डॉक्टर हजर न झाल्यामुळे त्यांची भेट निष्फळ ठरली आहे .परिसरात वातावरणातील बदलांमुळे 'व्हायरल इन्फेक्शन ' होत असून खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झाली आहेत .
पहूर येथे ग्रामीण रुग्णालयात अनेक वेळा गावातील आणि परिसरातील नागरीकांनी बळाचा वापर करून डॉक्टर्स, परिचारक तसेच दवाखान्याच्या इमारतीवर हल्ले केलेले आहेत . यामुळे येथे येणारे वैदयकिय अधिकारी तथा कर्मचारी नेहमीच जीव मुठीत धरून सेवा देत असल्याचे समोर आले आहे . काही लोकांच्या वाढत्या दहशतीमुळे आज पंचवीस दिवसांपासून रुग्णसेवा ठप्प झाली आहे . याची झळ मात्र गोरगरीब रुग्णांना बसत आहे .
उपजिल्हा रुग्णालयाची घोषणा केवळ नावालाच
आरोग्यदुत गिरीष महाजन यांच्या प्रयत्नांनी गेल्या वर्षी दिवाळीत पहूर ग्रामीण रुग्णालयाला
उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याची गोड बातमी पहूरवासीयांसह परिसरातील नागरीकांना सुखावून गेली . मात्र वर्ष उलटून गेले तरी रुग्णालयाची दशा पालटली नाही . आणि आता तर ग्रामीण रुग्णालयाचीही सेवा कोलमडली आहे . याकडे संबघित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे .
पहूर हे जळगांव -औरंगाबाद - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गांव असून सुमारे पंचवीस ते तीस हजार लोकवस्तीचे गाव आहे.परिसरातील तीस ते पस्तीस खेडी गावाला लागून आहेत . महामार्गावर अपघात घडून अनेकदा रुग्ण अत्यवस्थ होतात . अशा वेळी येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधायुक्त असणे ही प्राथमिक गरज आहे .
एक महिन्यांपासून बंद असेलेल्या रुग्णसेवेमुळे गोरगरीब सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत . दुसरीकडे रुग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे . अगोदरच अवकाळी पावसाने शेत माल उद्ध्वस्त शेतकरी मेटाकूटीस आला असून रुग्णालयाच्या खंडीत सेवेमुळे त्यात भर पडली आहे .तरी गावातील स्वतः नेता म्हणवून घेणारे गाव पुढारी लक्ष देतील काय असा प्रश्न गावकर्याँना पडला आहे. प्रतिक्रिया - १)पहूर रूग्णालया संदर्भात जळगाव येथील बैठकीत डाॕक्टर नियुक्ती बाबत सुचना देण्यात आल्याअसून लवकरच रूग्णसेवा सुरू करण्यात येईल. रत्ना राखुंडे , डेप्यूटी डायरेक्टर ,आरोग्य विभाग नाशिक 2)वरीष्ठांच्या आदेशानूसार पहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदावर लवकरच नियुक्ती कराण्यात येऊन रूग्णसेवा नियमीत सुरू होईल. डाॕ. हर्षल चांदा वैद्यकीय अधिक्षक , ग्रामीण रूग्णालय पहूर